इतिहासकालीन भारत हा खुप सम्रुद्ध आणि वैभवशाली होता.  भारतात सोन्याचा धुर निघत होता. अशाप्रकारे त्याचं वर्णन केलं जातं. या वैभवाच्या मोहानेच अनेक परकीयांनी भारतावर आक्रमणे केली. यात मुघल आघाडीवर होते. त्यानंतर इंग्रज, पोर्तुगीज, डच यांचा समावेश होतो. इंग्रजांनी “ईस्ट इंडिया कंपनी”च्या माध्यमातुन व्यापार केला. पुढे जावुन भारतावर साम्राज्य प्रस्थापित करुन भारताला गुलाम बनवले. इंग्रजांनी भारताची अमाप लुट केली. यात भारतातील कित्येक मौल्यवान वस्तु त्यांनी इंग्लंडमध्ये नेल्या. जाणुन घेवुया इंग्रजांनी भारतातुन इंग्लंडला नेलेल्या काही अमुल्य वस्तुंबद्दल.

जगदंबा तलवार

स्पेनच्या राजाने छत्रपती शिवाजी महाराजांना भेट केलेली हीच ती जगदंबा तलवार

1)जगदंबा तलवार :  छत्रपती शिवाजी महाराजांकडे असणार्या भवानी तलवार, जगदंबा तलवार आणि तुळजा तलवार. काही लोक जगदंबा तलवारीलाच भवानी तलवार समजण्याची चुक करतात. शिवाजी महाराजांनी युद्धात वापरण्यात येणार्या दुधारी तलवारींचं एक आंतरराष्ट्रीय टेंडर काढलं होतं. त्या काळी मराठे तीन ते साडेतीन फुटाच्या तलवारी वापरत असत. मराठ्यांचे युद्ध हे पठाणांबरोबर असायचे. पठाणांची उंची मराठ्यांपेक्षा एक-दीड फुट जास्त होती. या उंचीवर मात करण्यासाठी चार- साडेचार फुटांच्या या तलवारींचं त्यांनी टेंडर काढलं. या टेंडरला युरोपीय देंशांनी नकार दर्शवला. पण युरोपातीलच एक छोटासा देश “स्पेन” ने हे टेंडर स्वीकारलं. स्पेनला मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र बनवण्याचं टेंडर मिळाल्यामुळे स्पेनचा राजा खुप खुश झाला. खुश होवुन त्याने महाराजांना ही रत्नजडीत तलवार भेट केली.

पुढे शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर ब्रिटेनचा राजकुमार एडवर्ड सातवा याला नजराणा म्हणुन ही तलवार दिली गेली. सद्यस्थितीत ही तलवार लंडनच्या “राँयल पँलेस” मध्ये आहे.

कोहीनुर हीरा

कोहीनुर हीरा

2) कोहीनुर हीरा: 186 कँरेटचा हा हिरा खुपच मौल्यवान आहे. या हिर्याचा उल्लेख पुराणांमध्येसुद्धा आढळतो. याचा प्रथम उल्लेख  1306 मध्ये आढळतो. प्रथमत: हा मालवाच्या राजघराण्यापाशी कित्येक शतके होता. पुरातन काळामध्ये याला “समयंतक मणी” म्हणुन संबोधलं जायचं. ह्या हिर्याने भारतातील कित्येक साम्राज्ये बनताना बिघडताना पाहिली आहेत.

कोहीनुर हीरा गोवळकोंड्याच्या कोल्लुर खाणीमधुन सापडला. छोट्या अंड्याच्या आकाराचा हा हिरा खुप मौल्यवान आहे. खुपशा पर्शियन आणि भारतीय राज्यकर्ते तसेच खिलजी, बाबर यांच्याकडे राहिल्यानंतर याला इंग्रजांनी लुटुन नेला. पुढे त्यांनी इंग्लंडची महाराणी व्हिक्टोरियाला भेट केला. सद्यस्थितीत कोहीनुर लंडन tower मध्ये ठेवला आहे. असं म्हटलं जातं की या हिर्याला शाप अाहे. ह्या हिर्याचा मालक जगावर राज्य करेल. पण याला फक्त स्त्रीयाच परिधान करु शकतात.

टिपु सुलतानची तलवार आणि अंगठी

टिपु सुलतानची तलवार आणि अंगठी

3)टिपु सुलतानची तलवार आणि अंगठी :  टीपु सुलतानच्या खुपशा वस्तु ब्रिटेनमध्ये आहेत. त्यातीलच ही तलवार आणि अंगठी. टिपु सुलतानची तलवार उत्कृष्ट आणि दर्जेदार कलाकृतीचा नमुना होती. या तलवारीच्या जोरावर त्यांनी पुष्कळ युद्धे जिंकल्याचं मानलं जातं. टिपु सुलतानकडे एक खास अंगठी होती. श्रीरंगपट्टणमच्या युद्धात टिपु सुलतान मारला गेल्यावर इंग्रज त्याची ही अंगठी आणि तलवार सोबत घेवुन गेले.

सुलतानगंजमध्ये खोदकाम करताना सापडलेली बुद्धमुर्ती

सुलतानगंजमध्ये खोदकाम करताना सापडलेली बुद्धमुर्ती

4)सुलतानगंजमध्ये सापडलेली बुद्धमुर्ती : तब्बल 500 किलो वजनाची ही बुद्धमुर्ती. बिहारच्या भागलपुर जिल्ह्यातील सुलतानगंज याठिकाणी 1861 मध्ये रल्वेचे बांधकाम चालु असताना सापडली. त्यानंतर त्या मुर्तीला रेल्वे इंजीनियर “E.B. Harris” याने तातडीने बर्मिंघमला पाठवुन दिले. विशेषद्न्यांच्या मते ही मुर्ती इसवी सन 500-700 च्या दरम्यानची असावी असा अंदाज आहे. वर्तमानात ही मुर्ती ” बर्मिंघम म्युझियम अँड आर्ट गँलरी” (BMAG) येथे ठेवली आहे. या मुर्तीची आत्ताची किंमत तब्बल पन्नास लक्ष pounds एवढी सांगितली जाते.

सरस्वती मुर्ती

सरस्वती मुर्ती

5) भोजशाळेतील सरस्वती मुर्ती : इसवी सन 1034 मध्ये “राजा भोज” यांनी मध्यप्रदेशातील भोजशाळा मंदिरात या संगमरवरी मुर्तीची स्थापना केली होती. हिंदु धर्मामध्ये सरस्वतीला संगीत आणि विद्येची देवता म्हणुन संबोधले जाते. ही मुर्ती संगमरवरी दगडात कोरलेली कलाकारीचा एक उत्तम नमुना आहे. 1826 मध्ये जेव्हा इस्ट इंडिया कंपनीने मालवावर हल्ला केला तेव्हाच भोजशाळेवर हल्ला करुन तेथील स्मारके नष्ट केली. त्यातच ही वागदेवी मुर्ती चोरली असल्याचं म्हटलं जातं.

भेटा 3 idiots चित्रपटातील खर्याखुर्या रँचोला

Nassak_Diamond

Nassak Diamond

6) नस्साक हिरा: नस्साक हिरा तेलंगनातील मेहबुबनगरमधील अमरगीरी खाणीत सापडला होता. या हिर्याला पैलु पडण्याचे काम भारतात झाले. इसवी सन 1500 ते 1817 च्या दरम्यान नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात हा हिरा ठेवण्यात आला. 1818 च्या ब्रिटीश-मराठा युद्धात ईस्ट इंडिया कंपनीने या हिर्यावर ताबा मिळवला. पुढे तो ब्रिटीश व्यापार्यांना विकुन टाकला. 1970 मध्ये “Edward J. Han” याने तो हिरा 3.05 मिलीयन डाँलरला विकत घेतला. हा हिरा लेबनाँनच्या राँबर्ट मौवाद म्युझियममध्ये ठेवण्यात आला आहे.

इंटरनेटचे रॉबिनहुड “Anonymous” मानवतेसाठी लढणारा आतापर्यंतचा सर्वात मोठा hackers group

महाराजा रणजितसिंह यांचे सुवर्ण सिंहासन

महाराजा रणजितसिंह यांचे सुवर्ण सिंहासन

7) महाराजा रणजितसिंह यांचे सुवर्ण सिंहासन: हे सिंहासन हाफिज मोहम्मद मुलतानी याने 1820 ते 1830 च्या दरम्यान बनवले होते. राळ आणि लाकडापासुन बनवलेल्या या सिंहासनाला सोन्याने मढवण्यात आलं होतं. 1849 च्या दुसर्या ब्रिटीश-सीख युद्धात ब्रिटीशांनी ह्या सिंहासनावर कब्जा केला. 1851 मध्ये एका भव्य प्रदर्शनात हे सिंहासन ठेवण्यात आलं होतं. सध्या हे ब्रिटेनच्या “V&A” म्युझियममध्ये ठेवण्यात आलं आहे.

पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध वाहते या वनस्पतीची शाखा, जाणुन घ्या गरुड संंजीवनीबद्दल…