Anonymous fox mask

Fox mask : हा mask anonymous hackers त्यांची ओळख लपवण्यासाठी वापरतात

आजकाल हा mask तुम्ही भरपुर ठिकाणी पाहता. खुपशे लोक याचा सर्रास वापर करताना दिसतात. परंतु यामागची story खुपच interesting आहे.

Computer

Computer: आजच्या युगातील महत्त्वाचे साधन

satellite क्रांतीने जगाला खुप जवळ आणलं आहे. ज्यामुळे आपण जगभरातल्या घडामोडी घरबसल्या पाहु शकतो. हे सर्व इंटरनेटमुळेच शक्य आहे. ज्याप्रमाणे आपण जगभर एका click वर संपर्कात राहु  शकतो. त्याप्रमाणेच आपली खाजगी माहितीसुद्धा इंटरनेटच्या माध्यमातुन चोरली जावु शकते. ज्यामुळे तीचा वापर करुन कोणीही आपलं नुकसान करु शकतं. जगात असेही काही लोक आहेत जे मानवतेच्या भल्यासाठी hacking चा वापर करतात. ज्यात सर्वात वरचं स्थान आहे “anonymous hackers group” चं.

Anonymous hackers

Anonymous hackers: इंटरनेटचे गुढ रॉबिनहुड

Hackers चे दोन प्रकार असतात. त्यात “Black hat hackers” आणि “White hat hackers” हे प्रकार मोडतात. Black hat hackers बेकायदेशीर मार्गाने समाजविघातक कृत्ये घडवण्याचा प्रयत्न करतात. तर White hat hackers समाजोपयोगी कामे करतात. याच White hat hackers ची खुप मोठी संस्था आहे. जी “Anonymous hackers group” या नावाने ओळखली जाते.

कसा जन्म झाला या ग्रुपचा? : 4chan.org   नावाचे एक online forum आहे. या forum मध्ये सर्व users ची माहिती गोपनीय ठेवली जाते. ज्यात एकदा एका व्यक्तीने एका प्रसिद्ध नेत्याची funny image upload केली. त्या नेत्याच्या एका चाहत्याने त्या व्यक्तीला अभद्र भाषेत शिवागीळ करण्यास सुरुवात केली. तेव्हा एक व्यक्ती जो स्वत:ला “anonymous” सांगत होता. त्याने त्या शिवीगाळ करणार्याला बजावुन सांगितले की प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा पुर्ण पुर्ण अधिकार आहे. यावर शिवीगाळ करणाराने न ऐकल्यासारखं करत अभद्र भाषेत तो बोलतच राहिला. तेव्हा anonymous ने त्या व्यक्तीची खाजगी माहिती काढुन ती website वर टाकली.  त्यावेळी सर्वजण चकीत झाले. कारण या website वर सर्वांची माहिती गोपनीय होती.  इथुनच या ग्रुपची सुरुवात झाल्याचं मानलं जातं.

Anonymous hackers

कोण आहेत या ग्रुपचे सदस्य: असं मानलं जातं की या संस्थेमध्ये बारा वर्षांच्या मुलांपासुन ते पासष्ट वर्षांच्या professional hackers चा समावेश होतो. तसेच या संस्थेचा माहित असलेला कोणीही leader नाही. या ग्रुपमध्ये सहभागी होणार्या व्यक्तीला त्याची संपुर्ण ओळख लपवावी लागते. एका वेगळी ओळख धारण करुन आपला IP address लपवला जातो. याचे सभासद जगभर पसरले आहेत.हे लोक मानतात की इंटरनेटवर प्रत्येकाला आपलं म्हणणं माडण्याचा पुर्णपुर्ण अधिकार आहे. ज्याला आपण “Freedom of speech” असंपण म्हणु शकतो.

Anonymous ग्रुपचे कारनामे: या ग्रुपचा मुख्य उद्देश्य जनतेची फसवणुक करणार्या लोकांचा खरा चेहरा समोर आणने आहे. भ्रष्ट नेत्यांचा भ्रष्टाचार आणि त्यांची काळी रहस्ये हा ग्रुप जगासमोर उघड करतो. जगभर जर कुणावर अन्याय झाला तर ते व्यक्ती न्यायालयात न्याय मागु शकतात. पण इंटरनेटच्या बाबतीत न्यायव्यवस्था आणि कायदा थोडे कुचकामी पडतात. इंटरनेटवर असाच अन्याय झालेल्या लोकांना हे न्याय देतात.

विकीलिक्स (wikileaks) ही website भ्रष्ट नेत्यांची गुपिते उघड करण्यात प्रसिद्ध होती. आपली गुपिते सर्रास उघड केली जात असल्याने भ्रष्ट नेत्यांनी याचा धसका घेतला. पर्यायाने या website ला पुरवला जाणारा निधी त्यांनी खंडित केला. ही गोष्ट Anonymous ला योग्य वाटली नाही. प्रत्युत्तरादाखल Anonymous ने निधी गोठवणार्या सर्व बँकांवर हमला केला. आणि या बँकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नंतर या बँकांनी माघार घेतली. इंटरनेटवर होणार्या child pornography तुन मुलांवर होणार्या अन्यायावर त्यांनी आवाज उठवला. यात त्यांनी अनेक child pornography ला पाठिंबा देणार्या websites delete केल्या.

जगभरातल्या आतंकवादी संघटनांविरुद्धसुद्धा या ग्रुपने आवाज उठवला. त्यात ISIS चापण समावेश होतो. इंटरनेटवर असलेले ISIS चे संपवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तसेच deep web आणि dark web मध्ये होत असलेल्या  कृत्यांवर त्यांनी हमला केला. Deep and dark web एक भयावह सत्य आहे. यात live मर्डरची सुपारी घेणे, मानवी तस्करी, drug smuggling तसेच अनेक माणुसकीला काळीमा फासणारे प्रकार घडतात.

Anonymous ग्रुपचा you tube वरसुद्धा channel आहे. Anonymous official म्हणुन. यात एक व्यक्ती fox mask घालुन हावभाव करतो. तर आवाज हा text to speech पद्धतीचा वापर करुन देण्यात आला आहे.

Jio logo

Jio

Jio चे चायना connection: या ग्रुपने गोपनीयरीत्या संशोधन करुन jio देत असलेल्या unlimited data चा खुलासा केला आहे.  jio ग्राहकांना अमर्यादित data देत असतानाच ग्राहकांची खाजगी माहिती एका चायनीज कंपनीला विकत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

साभार : इंटरनेट

माहिती आवडल्यास नक्की share करा. तसेच facebook आणि instagram page ला भेट द्या.