आजच्या वेगवान आणि आधुनिक जीवनशैलीमध्ये जग खुप जवळ आलं आहे. पर्यायाने काही वर्षांपुर्वी अशक्यप्राय वाटणार्या गोष्टीसुद्धा आजकाल सहज उपलब्ध होत आहेत. आधुनिक तंत्रद्न्यानाने जग खुपच जवळ आले आहे. एका click वर माणुस जगातल्या कुठल्याही कोपर्यातुन संपर्क साधु शकतो. परंतु दळणवळणाच्या इतक्या संधी असताना माणुस एक गोष्ट विसरत चाललाय. ती म्हणजेच माणुसकी.

सवानाच्या जंगलातील एक दुर्मिळ दृश्य

सिंहाच्या छाव्याला हत्ती आपल्या सोंडेतुन घेवुन जात असतानाचे एक दु्र्मिळ दृश्य

माणुसकीचा र्हास होत  असतानाच प्राणीजगतातील एक दुर्मिळ आणि अनोखं चित्र जगासमोर आलं आहे. सिंहिण आणि तिचा छावा सवानाचे जंगल पार करत असताना त्यांना एक रस्ता लागतो. खुप उष्णता असल्याकारणाने त्या पिल्लाला रस्ता पार करता येत नाही. ही गोष्ट जवळच असलेल्या एका हत्तीच्या लक्षात येते. मग तो हत्ती त्या पिल्लाला सोंडेत उचलुन रस्ता पार करवतो. एकीकडे माणुसकी संपत चालली असताना या जंगली श्वापदांनी एक आदर्श मांडुन ठेवलाय. शेवटी जंगली श्वापदं माणुस की हे प्राणी हाच प्रश्न पडतो.

अजुन वाचा..

  1. भेटा 3 idiots चित्रपटातील खर्याखुर्या रँचोला
  2. इंटरनेटचे रॉबिनहुड “Anonymous” मानवतेसाठी लढणारा आतापर्यंतचा सर्वात मोठा hackers group
  3. पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध वाहते या वनस्पतीची शाखा, जाणुन घ्या गरुड संंजीवनीबद्दल…