विजय चव्हाण

50 नाटकांचे 100 हुन जास्त प्रयोग तसेच तब्बल 350 चित्रपटांमध्ये केला अभिनय- दिवंगत अभिनेते विजय चव्हाण

पछाडलेला या चित्रपटातील किरकिरे आणि जत्रा चित्रपटातील कानोळे या व्यक्तिरेखांमुळे जनमानसात प्रसिद्ध झालेले अभिनेते विजय चव्हाण उर्फ विजुमामा यांचे 24 ऑगष्ट 2018 ला निधन झाले.जाणुन घेवुयात विजय चव्हाण उर्फ विजुमामा यांच्याबद्दल.

स्पर्धात्मक रंगमंचावर काम करता करता त्यांनी व्यावसायिक रंगभुमीमध्ये प्रवेश केला.आचार्य अत्रेंच्या मोरुची मावशी या प्रंचड गाजलेल्या नाटकातील मावशी हे पात्र त्यांनी साकारले. मावशीचं हे पात्र विजय चव्हाण यांच्याशिवाय कोणी साकारुच शकत नाही असं लोक आजही सांगतात. तसंच त्यांनी केदार शिंदेंच्या तु तु मी मी या नाटकाच्या 20 प्रयोगांमध्ये अभिनय केला. मराठी  चित्रपटसृष्टीतील नाटकात कार्यरत असणार्या दिग्गज कलावंतांना दिल्या जाणार्या “Not Out” या उपाधीचे ते सर्वप्रथम मानकरी ठरले.

मराठी चित्रपटसृष्टीमधील त्यांचे कार्य वाखानण्याजोगं आहे. वहिनीची माया (1985) या चित्रपटातुन त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं. विजय चव्हाण यांनी अभिनय  केलेले चित्रपट झपाटलेला, पछाडलेला, जत्रा, मुंबईचा डबेवाला, श्रीमंत दामोदर पंत यांमध्ये त्यांचं अभिनयकौशल्य सहजपणे दिसुन येतं. त्यांनी अभिनयक्षेत्रात तब्बल चाळीस वर्षे काम केलं. त्यांच्या याच कारकिर्दीमुळे त्यांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.