भारतात पारशी समुदाय तसा तुरळकच आढळतो. हा समुदाय ओळखला जातो तो यांच्या देशाच्या योगदानाबद्दल. होमी भाभा, जमशेदजी टाटा, जहाँगीर रतनजी दादाभाई (J.R.D.) टाटा, आद्रेशीर गोदरेज, नरिमन मेहता असे अनेक महत्त्वाचे लोक याच समुदायातले आहेत. उद्योगशीलतेसोबतच हा समुदाय अजुनही एका कारणामुळे प्रसिद्ध आहे तो यांच्या मृत्युपश्चात विधीमुळे.

पारशी व्यक्तीच्या मृत्युनंतर त्याला जाळले किंवा पुरले जात नाही. या समुदायात मान्यता आहे की मनुष्य हा निसर्गापासुन बनलेला आहे. त्यामुळे मृत्युनंतर तो निसर्गातच मिसळला पाहिजे. याच मान्यतेखातर ते मृत व्यक्तीचे पार्थिव एका खास वास्तुमध्ये ठेवतात. ज्याला “tower of silence” किंवा ” दाखणा” असे म्हटले जाते. वर्तुळाकार कठडा आणि मध्यभागी खोलगट अशी या “tower of silence” ची रचना असते. कठड्यावर मृत व्यक्तीचे शरीर अशाप्रकारे ठेवलेले असते जेणेकरुन गिधाड, कावळे, घार आणि तत्सम पक्षांना ते खाता यावे. सामान्य माणसाच्या जीवाचा थरकाप उडावा अशाप्रकारचे हे दृश्य असते. मुंबईतील मलबार हील भागामध्ये  “tower of silence” आहे. हा वास्तुचा परिसर हा “most haunted places” मध्ये समाविष्ट केला गेला आहे. या भागामध्ये अनेकांना भुत दिसल्याचे सांगितले जाते.

Categories: Uncategorized