साप म्हटलं की समोर येते ती लांबसडक म्रुत्युसमक्ष एक भयानक आकृती. भारतात सापांबद्दल अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. तसेच अनेक गैरसमजदेखील आहेत.भारतात अनेक प्रकारचे विषारी तसेच बिनविषारी साप आढळतात. काही साप बिनविषारी असतात पण लोक त्यांचा विषारी समजुन जीव घेतात. त्यात कित्येक बिनविषारी सापांचा नाहक बळी जातो. आज जाणुन घेवुया भारतातील अशाच विषारी आणि बिनविषारी सापांबद्दल…

1)नाग 

नाग

नाग

साधारणपणे काळपट रंगाचा हा साप सर्वांच्या परिचयाचा आहे तो त्याच्या हिंदी चित्रपटातील अत्याधिक प्रदर्शनामुळे. पुर्ण वाढ झालेला नाग हा साधारण 1.9 मीटर लांब असतो. उंदीर, लहान साप, पक्षांची अंडी, लहानलहान पक्षी हे त्याचे खाद्य. सर्वसामान्यपणे जंगल, शेतामध्ये आढळणारा हा साप मानवाच्या अतिक्रमणामुळे मानवी वस्तीमध्येसुद्धा आढळतो. हा अत्यंत विषारी साप असुन याच्या विषाचा प्रभाव थेट चेतासंस्थेवर प्रभाव करतो. याचे विष “न्युरोटॉक्सिक असते. याच्या विषाच्या प्रभावामुळे चेतासंस्था निकाम होण्याचा तसेच मृत्यु होण्याचा धोका संभवतो.

2)फुरसे (saw scaled viper)

फुरसे ( saw scaled viper)

फुरसे ( saw scaled viper)

हा याच्या करवतीच्या दातर्यांसारख्या असलेल्या खवल्यांमुळे ओळखता येतो. हा भारतात सर्वत्र आढळणारा साप असुन मुख्यत्वे कोकणातील रत्नागिरी प्रभागात याचा जास्त वावर आढळतो.हा भारतातील  सर्वात जास्त चार विषारी सापांपैकी एक आहे. फुरसे भारतात सर्वाधिक सर्पदंशांचे कारण ठरलेला आहे. याची लांबी साधारण 40-50 सेंमी असते. अपवादात्मक स्थितीमध्ये हा 80-85 सेंमी पर्यत आढळतो. हा रंगाने तपकिरी, फिकट पिवळसर असतो.हा साप प्रामुख्याने खडकाळ, वाळु आणि डोंगराळ प्रदेशात आढळतो. दगडांच्या खाली लपायला याला आवडते. हा साप अत्यंत चपळ असुन सेकंदाच्या तिसर्या भागाएवढ्या कमी वेळात तो दंश करतो. दंश झालेला माणुस 24 तासाच्या आतमध्ये दगावतो. तर कधीकधी तो 2-20 दिवस पण जगतो. हा एकावेळी 15-20mg विष सोडतो. याचे विष नागापेक्षा पाचपट तर घोणस सापापेक्षा सोळापट जास्त विषारी असते. हा साप बेडुक, सरडे, पाली, लहान साप खातो.याचे विष “हिमोटॉक्सिक” प्रकारचे असुन त्यामुळे रक्त पातळ बनते. ज्यामुळे शरीराच्या विविध भागांतुन रक्तस्त्राव होवुन मृत्यु होतो.

3) घोणस (Daboia) डाबोया

घोणस साप

घोणस साप

हा साप मुख्यत्वे भारतीय उपखंड, चीन, तैवानमध्ये आढळतो. हासुद्घा भारतातील प्रमुख चार विषारी सापांपैकी एक आहे.घोणस प्रामुख्याने जंगलात आढळतो. कधीकधी याचे वास्तव्य मानवी वस्तीतसुद्धा आढळुन येते. याला ओळखण्याचा सोपा उपाय म्हणजे याच्या पाठीवर तसेच पाठीच्या उजव्या आणि डाव्या बाजुला साखळीसारख्या आकाराच्या तीन पिवळसर, तपकिरी, हिरवट पट्ट्या असतात. या सापाने उत्क्रांतीच्या काळात आपले दात दुमडुन घेण्याची कला अवगत केली आहे. कधीकधी दंश करताना हा दात दुमडुनच दंश करतो. ज्यामुळे विष शरीरात पसरत नाही. याला “कोरड चावा” असे म्हणतात. याचा फुत्कार कुकरच्या शिट्टीप्रमाणे असतो. घोणस हा साप त्याची अंडी पोटातच उबवतो मग पिल्ले अंड्यातुन बाहेर आली की त्यांना शरीरीबाहेर काढतो. याचेही विष हिमोटॉक्सिक असुन हे रक्तातील गुठळ्या अथवा गाठी तयार करणार्या प्रथिनांचा नाश करते. ज्यामुळे कान, नाक, तोंडावाटे रक्तस्त्राव होवुन रुग्ण दगावतो. याचा उपचार करताना चावलेल्या जागी मलमपट्टी करु नये. प्रतिविषाचा वापर करावा. तसेच रुग्णाला पाणी पिण्यास देवु नये.

4) मण्यार 

मण्यार साप

मण्यार साप

नाग, फुरसे, घोणस यांप्रमाणेच मण्यार किंवा मणेरचा भारतातील चार प्रमुख विषारी सापांमध्ये समावेश होतो. मण्यारच्या प्रमुख जाती साधा मण्यार, पट्टेरी मण्यार, काळा मण्यार आहेत. कवड्या हा बिनविषारी साप दिसायला मण्यारसारखा असल्याने त्याला काहीवेळा मण्यार समजण्याची चुक केली जाते. कवड्या साप भिंतीवर चढण्यास सक्षम असतो तर मण्यार नसतो. मण्यारच्या 10 उपजाती आहेत त्यांचा वावर मुख्यत्वे आग्नेय आशियायी देशांमध्ये आढळतो. हा साप प्रामुख्याने जंगल भागात आढळतो. थंड जागा याला आवडत असल्याने घरात हा सापडल्याच्या घटनासुद्धा घडल्या आहेत. हा निळसर रंगाचा असुन याच्या शरीरावर पांढरे ठिपके आढळतात. हा निशाचर असुन याला रात्री फिरायला आवडते. हा साप प्रामुख्याने उंदीर, पाली, सरडे, छोटे साप तसेच बेडुक खातो. मण्यारचे विष नागाप्रमाणेच “न्युरोटॉक्सिक” असुन हे शरीराच्या चेतासंस्थेवर प्रभाव करुन ते निकामी करते. याचे विष नागापोक्षा पंधरापट जास्त जहाल अथवा विषारी आहे. दंश झाल्यावर तहान लागणे, पोट दुखणे, श्वासोच्छवासास अडचण येणे असे परिणाम दिसुन येतात. ज्यामुळे मेंदुची कार्यप्रणाली बंद पडुन श्वास घेण्याची क्षमता नष्ट होवुन मृत्यु ओढवतो.

5) नागराज (king cobra)

king cobra (नागराज)

king cobra (नागराज)

पाहताक्षणीच धडकी भरावी असा हा साप. भारतात हा नागराज, भुजंग, King cobra या नावाने ओळखला जातो. फणा काढल्यावर मागुन याचा फणा राजाच्या मुकुटासारखा दिसतो ज्यामुळे याला नागराज असे नाव पडले आहे. या सापाची प्रचंड प्रमाणात दहशत असुन एका मोठ्या हत्तीला मारण्याची याच्या विषात ताकद असते. नाग, अॉडलर आणि आफ्रिकेतील ब्लँक माम्बा हे याच्याच जातीतले विषारी सर्प. हा प्रामुख्याने घनदाट जंगलात आढळतो. माणवाशी याचा संपर्क क्वचीतच आढळतो. याचे विष नागापेक्षा कमी जहाल असले तरी विषाच्या जास्त प्रमाणामुळे हा जास्त धोकादायक समजला जातो. भारताच्या पुर्व तसेच दक्षिण भागात हा आढळतो. हा साप चावल्याच्या अर्ध्या तासाच्या आत माणसाचा मृत्यु होतो. नागराज महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमावर्ती भागामध्ये, केरळ राज्य तसेच आसामच्या जंगलांमध्ये आढळतो. एका चाव्यामध्ये हा 400-500 mg एवढे विष सोडतो. साधारण पंधरा मिनिटांत व्यक्तीचा मृत्यु होतो सरासरी वेळ हा 30-45 मिनिटे आहेे. याचा दंश झालेल्या 75%  व्यक्ती दगावल्या आहेत. हा साप तीन ते चार फुट उभा राहु शकतो. तसेच दोन मीटरच्या परिघामध्ये हमला करु शकतो. साप दुर आहे असा गैरसमज झाल्यामुळे जवळ जावुन दंश घडल्याच्या घटना घडल्या आहेत. याची लांबी साधारण 15-20 मीटर असुन हा जवळपास 20 वर्षे जगतो. नर मादीपेक्षा मोठा आणि जाड असुन याला कंपने सहज जाणवतात.

हा जन्मापासुनच चिडखोर आणि आक्रमक असुन पिल्लांचे विष जन्मताच प्रौढ सापाएवढे विषारी असते. हा मानवी संपर्कात येत नसला तरी डिवचल्यावर आक्रमक होतो. फणा काढुन विषारी दात दाखवुन हा सुस्कारा सोडतो. याच्या आवाजाची तिव्रता सर्वात जास्त 2500 HZ पर्यंत असते. हा साप प्रामुख्याने इतर विषारी सापांना खातो काहीवेळा उंदीर वगैरे तत्सम प्राण्यांना खातो. दंश केल्यावर गिळतानाच त्याच्या विषामुळे पचन होते. याच्या विषामुळे ह्रद्यविकार, पक्षाघात, कोमा प्रकार घडतात.

याच्या प्रतिविषाची उपलब्धता कमी असुन कर्नाटक राज्यातील शिमोग जिल्ह्यातील अगुंबे संशोधन केंद्रात त्याचे संरक्षण व संशोधन होते.