मित्रांनो तुम्ही सर्वांनी “3 idiots” हा चित्रपट नक्कीच पाहिला असेल. ह्या चित्रपटातील फुंसुख वांगडु हे पात्र सर्वांच्या लक्षातच असेल. आणि का असणार नाही? आपल्या अफलातुन प्रयोगांमधुन आमिर खानने या पात्रात जीव ओतला आहे. तर जाणुन घेवुया या पात्रामागची खरीखुरी व्यक्ती सोनम वांगचुक यांच्याबद्दल.

सोनम वांगचुक

सोनम वांगचुक: खरेखुरे रँचो, दर्जाहीन भारतीय शिक्षणपद्धतीचा चेहरा पुर्णपणे पालटणारे व्यक्ती

सोनम वांगचुक यांच्याबद्दल:  सोनम वांगचुक यांचा जन्म 1सप्टेंबर 1966 रोजी  लडाखचे एक छोटेसे गाव “उले टोकपो” येथे झाला. वांगचुक यांचे वडील एक नेता होते. त्यांच्या वडिलांना राज्यात मंत्रीपदसुद्धा मिळालेलं. सोनम वांगचुक यांनी जर मनात आणलं असतं तर त्यांनी राजनीतीमध्ये प्रवेश केला असता. पण त्यांना तसं करण्यापेक्षा समाजातील अशिक्षित वर्गाची मदत करणं जास्त महत्वाचं वाटलं. आज लडाखचा साक्षरता दर 72.20% आहे. यात सोनम वांगचुक यांचा मोलाचा वाटा आहे.

SECMOL_ladakh_main_building

SECMOL: लडाख येथील प्रतीविद्यापीठाची मुख्य इमारत

प्रतीविद्यापीठाची स्थापना:  वांगचुक यांनी 1988 मध्ये इंजीनियरींग पुर्ण केली. शिक्षण पुर्ण झाल्यावर त्यांनी आपले काही नातेवाईक आणि सहकार्यांसोबत “Children education and cultural movement ladakh” या संस्थेची स्थापना केली. भारत सरकारच्या सर्व शिक्षा अभियानाच्या बारा वर्षे अगोदरच त्यांनी हे कार्य चालु केले. पाठ्यपुस्तकातील भाषा ही स्थानीक भाषेपेक्षा वेगळी होती. याकारणाने मुलांना अभ्यास करण्यास अडथळा येत होता. यावर उपाय म्हणुन त्यांनी जम्मु काश्मीर सरकारच्या मदतीने पाठ्यपुस्तकांचे  स्थानीय भाषेत भाषांतर केले. त्यांनी एका अनोख्या विद्यापीठाची स्थापना केली. ज्यात मुलांकडुनच मुलांना शिकवलं जातं.

हिमस्तुप (ice-stups)

लडाख येथील हिमस्तुप (ice-stups): उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची कमतरता भरुन काढण्यासाठी सोनम वांगचुक यांनी केलेला खास उपाय

इंटरनेटचे रॉबिनहुड “Anonymous” मानवतेसाठी लढणारा आतापर्यंतचा सर्वात मोठा hackers group

हिमस्तुप (बर्फाचे डोंगर उभारण्याची संकल्पना):  वांगचुक हे सध्या शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्याच्या कमतरतेवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत.बर्फाळ प्रदेशात मे, जुन महिन्यात होणार्या पाण्याच्या कमरतेवर त्यांनी खासा उपाय शोधला. कमी उंचीच्या भागातील झर्याच्या पाण्याचा वृक्षारोपण, शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग केला. यात त्यांनी झर्याच्या सहा फुट खाली पाईप जोडुन हे पाणी जास्त उंचीच्या भागात सायफनद्वारे(cyphon) वळवले. वर आल्यावर कारंज्याच्या रुपातील हे पाणी -20 अंश सेल्शियस इतक्या थंड हवेच्या संपर्कात येवुन बर्फाचा आकार घेते. त्यामुळे त्याचे छोटेछोटे डोंगर बनवुन गरजेच्या काळात ते उपयोगात आणता येते. या डोंगरांना हिमस्तुप(ice-stups) असं नाव दिलं आहे.

मुलांचं मुलांसाठीचं विद्यापीठ:  वांगचुक यांनी स्थापन केलेल्या प्रतिविद्यापीठात सर्व कार्य मुलांसाठी आणि मुलांंमार्फत केले जाते. मुलांना पुस्तकी अभ्यासापेक्षा प्रत्यक्ष कृतीतुन अनुभव आणि शिक्षण देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तुम्हाला कसं वाटेल अशा शाळेत शिकायला? या विद्यापीठातील मुले स्वत:चं वृत्तपत्र आणि रेडियो स्टेशनपण चालवतात. या विद्यापीठाला उर्जा ही सौरउर्जेमार्फत पुरवली जाते. -15 अंश सेल्सियस इतक्या कमी तापमानात सौरयंत्रणेद्वारे इमारतीचे तापमान 15 अंश सेल्सियल इतके वाढवण्यात आले आहे.

चित्रपटात दाखवलेल्या फुंसुख वांगडुपेक्षा सोनम वांगचुक यांचं कार्य खुप मोठं आहे. त्यांचा हा शिक्षणप्रणाली बदलण्याचा विचार तुम्हाला कसा वाटला?

लेख आवडल्यास share करायला विसरु नका. तसेच तुमचे याबद्दल काय विचार आहेत ते नक्की कळवा. धन्यवाद.