14 ऑगष्ट 1947 च्या मध्यरात्री संपुर्ण भारत देश एका चैतन्याने भारलेला होता. दीडशे वर्षांच्या काळोख्या गुलामीतुन स्वातंत्र्याची पहाट अनुभवायला आसुसलेला होता. सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते. आणि अखेर तो क्षण आला. रात्री बाराच्या ठोक्यावर भारताचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरु यांनी पारतंत्र्याची निशाणी असलेला युनियन जँक उतरवुन तिरंगा फडकवला.

पण हे स्वातंत्र्य पुर्ण स्वातंत्र्य नव्हते. अर्धी लढाई जिंकलेली पण अर्धी अजुन बाकी होती. ती लढाई होती  उरलीसुरली संस्थाने भारतात विलीन करुन घेण्याची. संस्थानांच्या अधिपत्याखाली येणार्या जनतेला भारतात विलीन होण्याची प्रबळ इच्छा होती. पण आपले पद प्रतिष्ठा हिरावुन जाण्याच्या भीतीपोटी संस्थानिक विलीन व्हायला तयार नव्हते.

अशातच अनेक देशभक्त नेते या कामी पुढे आले. यात आघाडीवर होते ते म्हणजे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल. सरदारांनी संस्थानिकांना विश्वासात घेवुन फक्त परराष्ट्रसंबंंध, दळणवळण आणि संरक्षण खाती भारत सरकारकडे देवुन बाकीची खाती संस्थानिकांकडेच राहतील असे आश्वासन दिले आणि तसा करार केला.

आता फक्त जुनागढ, काश्मीर, हैदराबाद आणि पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेलं गोवा सामील व्हायचं बाकी होतं.

जुनागढ जुनागढच्या नवाबाला पाकिस्तानमध्ये विलीन व्हायचं होतं पण अखेर प्रजेच्या दबावाखातर 1948 च्या फेब्रुवारीमध्ये  जुनागढ भारतात विलीन झालं.

काश्मीर काश्मीरचा तत्कालीन राजा राजा हरिसींग याने स्वतंत्र राहायचे ठरवले होते. याच संधीचा फायदा घ्यावा असे पाकिस्तानला वाटु लागले. यातुनच पाकिस्तानने राजा हरिसिंगवर दबाव आणायला सुरुवात केली. आँक्टोबर 1947 मध्ये पाकिस्तानच्या चिथावणीने सशस्त्र घुसखोरांनी काश्मीरवर हल्ला केला. नाईलाजाने हरिसिंगने भारतात सामील होण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. काश्मीर भारतात सामील झाल्यावर काश्मीरच्या मदतीसाठी लष्कर रवाना झाले. लष्कर घुसखोरांना हुसकावण्यात यशस्वी तर झाले पण काश्मीरचा काही भाग पाकिस्तानच्या ताब्यात गेला.

 स्वामी रामानंद तीर्थ

स्वामी रामानंद तीर्थ

हैदराबाद हैदराबाद हे त्याकाळातले एक मोठे संस्थान होते. त्यात कन्नड, मराठी, तेलगु भाषिकांचा समावेश होता. हैदराबादच्या मुक्तीसाठी स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली. या संस्थेला मिळणारा प्रतिसाद पाहुन निजामाने या संस्थेवर बंदी घातली. निजामाला हे संस्थान पाकिस्तानात विलीव करायचे होते. निजामाच्या संमतीने कासीम रिझवी याने रझाकार ही संघटना स्थापन केली. शेवटी भारत सरकारने 13 सप्टेंबर 1948 रोजी निजामाविरुद्ध कारवाई केली. पाच दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर 17 सप्टेंबर 1948 ला हैदराबाद भारतात विलीन झाले. 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्रामदिन म्हणुन साजरा केला जातो.

गोवा गोवामुक्तीसाठी डाँ. टी.बी. कुन्हा, डाँ. राममनोहर लोहिया यांनी मडगावमधे सभाबंदीचा आदेश मोडुन सभा घेतली. 1954 मध्ये गोवामुक्ती समिती स्थापन करुन सत्याग्रहींच्या तुकड्या गोव्यात पाठवण्यात आल्या. या तुकड्यांवर पोर्तुगीजांनी अतोनात जुलुम केले. काही केल्या पोर्तुगीज भारत सरकारला दाद देत नव्हते. अखेर सैन्यबळाचा वापर करुन 1961 च्या डिसेंबरमधे प्रवेश केला गेला. थोड्याच दिवसात पोर्तुगीज शरण आले. 19 डिसेंबर 1961 ला गोवा भारतात विलीन झाला.

गोवा भारतात विलीन झाला तेव्हा खरी स्वातंत्र्यपुर्ती झाली.

Download and earn